कटप्पानं बाहुबलीला का मारलं?, ‘जिओ मामि’मध्ये कळणार ?

October 19, 2016 8:47 PM0 commentsViews:

bahubali 219 ऑक्टोबर : कटप्पानं बाहुबलीला का मारलं? या प्रश्नाचं उत्तर कदाचित यावेळी मामिमध्ये मिळू शकेल. कारण बाहुबली 2 सिनेमाचा फर्स्ट लूक मामिमध्ये लाँच होतोय. त्यावेळी बाहुबली 2च्या कलाकारांशी संवादही साधता येईल.जिओ मामि फिल्म फेस्टिवल 20 ऑक्टोबरपासून सुरू होतोय. रसिकांना या महोत्सवात नेहमीप्रमाणे सिनेमांचा खजिना मिळणार आहे. देशातल्या आणि परदेशातल्या विविध भाषांमधल्या सिनेमांचा आस्वाद या महोत्सवात घेता येईल.

प्रियांका चोप्रा व्हेंटिलेटर सिनेमातून मराठी सिनेमा निर्मितीत प्रवेश करतेय.व्हेंटिलेटरचा प्रीमियर मामिमध्ये होणार आहे. आशुतोष गोवारीकरमधला अभिनेता ब•याच वर्षांनी आपल्याला या सिनेमातून पाहायला मिळेल.

कोंकणा सेन शर्माही पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून समोर येतेय. तिच्या द डेथ इन द गुंज सिनेमाचा प्रीमियर या महोत्सवात होतोय. या सिनेमात कल्की कोचीनचीही भूमिका आहे.

मामिमध्ये द न्यू मीडियम हा एक विभाग आहे. त्यात वेगळ्या पठडीतले सिनेमे पाहता येतील. त्यात शाहरूख खानचा अहमक सिनेमा आहे. अहमक हा 90च्या शतकातला सिनेमा. तो चार भागात दूरदर्शनवरही दाखवला होता. हा सिनेमा पहिल्यांदाच मामिमध्ये दाखवला जातोय.

याशिवाय फिलिपाइन्स, क्युबा, फ्रान्स,जर्मनी, अमेरिका अशा अनेक देशांच्या सिनेमांचा खजिनाच मामिमध्ये आहे. सई परांजपे यांचा विशेष गौरव मामिमध्ये होणारेय. 27 ऑक्टोबरपर्यंत मामि फेस्टिवलचा आस्वाद घेता येईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close