जगाचा निरोप घेऊन ‘त्याने’ दिलं 4 जणांना जीवनदान !

October 19, 2016 9:48 PM0 commentsViews:

19 ऑक्टोबर : नांदेडमध्ये पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडोर करण्यात आलंय. अवयव दान करून ‘त्याने’ चार जणांचा जीव वाचवला. तर दोन जणांना दृष्टी दिलीये.

अपघातात ब्रेन डेड झाल्यानंतर अवयव दान करण्यासाठी नांदेडमध्ये प्रथमच ग्रीन कॉरिडोर करण्यात आलं. नांदेडमध्ये 36 वर्षांच्या सुधीर रावळकर यांचा अपघाती मृत्यू झाला. अपघातात त्यांचा मेंदू मृत झाला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी सुधीर रावळकर यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.

nanded_newsमुंबई, पुणे आणि औरंगाबादच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रावळकर यांचे अवयव काढले. त्यानंतर ह्रदय मुंबईच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये तर लिव्हर पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. विशेष म्हणजे त्यांचे अवयव एअर अम्ब्युलन्सनं पाठवण्यात आले. सुधीर रावळकर यांच्या दोन्ही किडन्या औरंगाबाद इथं पाठवण्यात आल्या. त्यांचे डोळे नांदेड येथील शासकीय रूग्णालयात गरजुला दिले जाणार आहेत.

अवयव नेण्यासाठी नांदेडचे शासकीय रुग्णालय ते विमानतळ असे जवळपास 20 किलोमीटरच्या अंतरावर ग्रीन कॉरिडोर करण्यात आलं. यावेळी शहराची सर्व रहदारी थांबवण्यात आली होती. सुधीर रावळकर यांच्या कुटुंबियांच्या निर्णयामुळे 4 जणांना नवीन जीवनदान तर दोघांना नवीन दृष्टी मिळणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close