महागाईविरोधात तिसर्‍या आघाडीचा बंद

April 27, 2010 9:11 AM0 commentsViews: 1

29 एप्रिल

वाढत्या महागाईविरोधात आज तिसर्‍या आघाडीने देशभरात बंद पुकारला आहे.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करत, सरकारनेच ही महागाई लादल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

उत्तरप्रदेशात रेल्वे अडवण्यात आल्यात. समाजवादी पार्टी कार्यर्त्यांनी गाझियाबादला शताब्दी एक्स्‌प्रेस अडवली. अलाहाबादमध्ये बसेसही जाळण्यात आल्या.

आजच्या बंदचा डावेशासित राज्यांवर चांगलाच परिणाम जाणवणार आहे.

दरम्यान परीक्षा सुरू असणार्‍या विद्यार्थ्यांना या बंदचा फटका बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये अनेक विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली आहेत.

ओरिसा, उत्तर प्रदेश, त्रिपुरा आणि केरळमध्येही बंदचा परिणाम जाणवत आहे. कच्च्या तेलाबरोबरच इंधनदरांवर नियंत्रणाची विरोधकांची मुख्य मागणी आहे.

close