मुख्यमंत्र्यांना भेटलेले ‘ते’ गुंड नाहीत, संजय काकडे उवाच

October 19, 2016 9:59 PM0 commentsViews:

pune_gunda_bjp19 ऑक्टोबर : मुख्यमंत्र्यांना भेटलेले पप्पू घोलप शाम शिंदे आणि पिंटू धाडवे गुन्हेगार नसल्याचं स्पष्टीकरण भाजप खासदार संजय काकडे यांनी दिलंय. मुख्यमंत्र्यांना भेटलेले तिघेही गुन्हेगार नाहीत. त्यांच्यावरचा एकही गुन्हा सिद्ध झाला नाही. त्यामुळं त्यांना गुन्हेगार कसं म्हणता असा उलट सवाल काकडे यांनी उपस्थित केलाय.

पुण्यातला कुख्यात गुंड बाबा बोडकेचा फोटो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झळकला होता. या फोटोमुळे भाजपवर चोहीबाजून टीका झाली. यावर भाजपने सारवासारव केली खरी पण या फोटोमध्ये असणारे भाजपचे खासदार संजय काकडे यांनी वेगळाचा खुलासा केलाय. पिंटु धावडेवर गुन्हे नाहीत, तर पप्पू घोलपवर केसेस आहेत हे माहित नव्हतं. पप्पू घोलप पक्षप्रवेशाबाबत गिरीश बापट यांना माहिती होती. शिवाय त्या तिघांनी भाजपमध्ये प्रवेश केलाच नाही असा पवित्रा काकडेंनी घेतलाय. ती फक्त सदिच्छा भेट होती हे सांगायलाही ते विसरले नाहीत. मुख्य म्हणजे मुख्यमंत्र्यांनी चुकून त्यांच्या गळ्यात भाजपचे शेले घातल्याचा दावाही काकडेंनी केलाय.

विशेष म्हणजे, संजय काकडे यांच्या पुढाकाराने खून, खुनाचा प्रयत्न,पोलिसांना मारहाण,दंगल माजवणे,जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यातील पप्पू घोलप, शाम शिंदे,पिंट्या धाडवे या आरोपींना रावसाहेब दानवे, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे,विनोद तावडे यांच्या हजेरीत भाजप मध्ये प्रवेश देण्यात आला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close