न्यू वेव्ह पैठणी प्रदर्शनाचं महेश म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन

October 19, 2016 5:52 PM0 commentsViews:

मुंबई, 19 ऑक्टोबर : दादरच्या शिवाजी पार्कच्या स्काउट गाईडच्या सभागृहात न्यू वेव्ह या पैठणी साड्यांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते आज करण्यात आलं. राज्यातील पैठणी कारागिरांना मुंबईतील बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी गेल्या 27 वर्षांपासून हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. हातमागाची पैठणी ही यंदाच्या प्रदर्शनाची थीम आहे. या प्रदर्शनात 8 हजार ते 2 लाखांपर्यंतच्या पैठणी उपलब्ध आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close