‘ए दिल है मुश्किल’ला विरोध करणाऱ्या 12 मनसे कार्यकर्त्यांना अटक

October 20, 2016 12:04 AM2 commentsViews:

mns_vs_karan_johar19 ऑक्टोबर :’ए दिल है मुश्किल’ चित्रपटाविरोधात आंदोलन करणा•या 12 मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीये. तर आणखी काही मनसे कार्यकर्त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. आज सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. पोलिसांनी खबरदारी म्हणून मनसे कार्यकर्त्यांना अटक केलीये.

दिग्दर्शक करण जोहर यांनी यापुढे पाकिस्तानी कलाकारांना सिनेमात घेणार नाही अशी जाहीर ग्वाही दिली. त्यानंतर सुद्धा मनसेनं आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी ए दिल है मुश्किल चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिलाय


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Sushant Sane

    सिनेमा प्रदर्शित व्हायला अजून अवकाश आहे. पाकिस्तानी कलाकार असलेला हा सिनेमा आपल्या चित्रपटगृहात दाखवू नका असे निवेदन घेऊन मनसे कार्यकर्ते सिनेमागृहात गेले होते आंदोलन करायला गेले नव्हते. या ढोंगी सरकारने मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांकरवी अटक करून घेऊन ४ नोव्हेंबर पर्यंत जेल मध्ये पाठविले आहे. जे काम सरकार ने करायला हवे ते मनसे हा पक्ष करत आहे. आणि हे ढोंगी सरकार त्यांच्याच कार्यकर्त्यांना अटक करत आहे. कोणत्याही पाकिस्तान्याला भारतात पैसे कमावण्याचा अधिकार नाही. आणि काही पाकप्रेमी भारतीयांना सुद्धा धडा मिळणे गरजेचे आहे.

  • Sushant Sane

    सिनेमा प्रदर्शित व्हायला अजून अवकाश आहे. पाकिस्तानी कलाकार असलेला हा सिनेमा आपल्या चित्रपटगृहात दाखवू नका असे निवेदन घेऊन मनसे कार्यकर्ते सिनेमागृहात गेले होते, आंदोलन करायला गेले नव्हते. या ढोंगी सरकारने मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांकरवी अटक करून घेऊन ४ नोव्हेंबर पर्यंत जेल मध्ये पाठविले आहे. जे काम सरकार ने करायला हवे ते मनसे हा पक्ष करत आहे. आणि हे ढोंगी सरकार त्यांच्याच कार्यकर्त्यांना अटक करत आहे. कोणत्याही पाकिस्तान्याला भारतात पैसे कमावण्याचा अधिकार नाही. आणि काही पाकप्रेमी भारतीयांना सुद्धा धडा मिळणे गरजेचे आहे.

close