नागपुरात पुन्हा ट्रॅफिक पोलिसावर हल्ला

October 20, 2016 2:45 PM0 commentsViews:

police_traficनागपूर, 20 ऑक्टोबर : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये संत्रामार्केट भागात एका ट्रॅफिक पोलिसावर अशाच ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह कारवाई अंतर्गत कारवाई केल्याचा राग मानत त्याने ट्रॅफिक पोलिसावर हल्ला केला. महिनाभरात ट्रॅफिक पोलिसावर जीवघेणा हल्ला होण्याची दुसरी घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

नागपुरच्या मानेवाडा चौकात बुधवारी रात्री ड्युटीवर असाणा•या रोहित खडतकर आणि रामचंद्र रोहणकर यांनी दारू पिऊन गाडी चालवणा•या गुणवंत तुमसरे याची गाडी ड्रंक आणि ड्राईव्ह कार्यवाईंअंतर्गत चालान केली. याचाच राग मानत गुणवंत तुमसरे यांने आपला मुलगा आणि काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बोलावून घेतले आणि दोन ट्रॅफिक पोलिसांवर काठीने हल्ला केला.

या हल्ल्यात रोहित खडतकर हे गंभीर जखमी झाले आहे आणि त्यांना जीएमसी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून गुणवंत तुमसरे या आरोपीला अटक झाली, आणखी चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. जखमी पोलिसांची प्रकृती स्थिर आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close