सचिन झाला क्रिकेटचा विश्वसम्राट.

October 17, 2008 10:07 AM0 commentsViews: 4

दिनांक 17 ऑक्टोबर, मोहोली- सचिनने आज ब्रायन लाराचा विश्वविक्रम मोडला. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्सचा रेकॉर्ड आता सचिनच्या नावावर जमा झाला आहे. मोहाली टेस्टमध्ये खेळताना सचिननं लाराचा 11,953 रन्सचा विक्रम मोडला.सचिननं आत्तापर्यंत 152 मॅचमध्ये खेळताना11954 रन्स केले आहेत. त्यात त्याने 39 सेंच्युरी केल्या. टेस्ट मॅचमध्ये सर्वाधिक रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड याआधी ब्रायन लाराच्या नावावर होता. लारानं 131 मॅचमध्ये 11953 रन्स केले आहेत. यात त्याच्या नावावर 34 सेंच्युरी जमा आहेत. आत्तापर्यंत 10,000च्या क्लबमध्ये सात खेळाडूंचा समावेश आहे. सचिंन तेंडुलकर आणि ब्रायन लारानंतर 10,000च्या क्लबमध्ये अ‍ॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, सुनील गावस्कर, रिकी पॉटिंग आणि राहुल द्रविडचा समावेश आहे. राष्ट्रपतीसह अनेकांनी विश्वविक्रमासाठी सचिनचं अभिनंदन केलं आहे.

close