अवतारचा डीव्हीडी विक्रीचा रेकॉर्ड

April 27, 2010 10:47 AM0 commentsViews: 8

29 एप्रिल

जेम्स कॅमेरुन दिग्दर्शित अवतार या सिनेमाला बॉक्स ऑफीसवर तर यश मिळालेच पण आता हा सिनेमा सर्वाधिक डिव्हीडी विक्रीचा रेकॉर्ड बनवत आहे.

जेम्स कॅमेरुनचा अवतार हा सिनेमा आता डीव्हीडीजवर मिळत आहे. पण या सिनेमाची बातमी इथेच थांबत नाही. तर ही डीव्हीडी नॉर्थ अमेरिकेतील सर्वात जास्त संख्येने विक्री झालेली डीव्हीडी आहे.

केवळ चार दिवसात तब्बल सहा पॉईंट सात मिलियन डॉलर्स या डीव्हीडी विक्रीतून मिळालेत. यापूर्वी द डार्क नाईट या सिनेमाने 2008मध्ये डीव्हीडीचा सर्वाधिक विक्रीचा रेकॉर्ड केलेला आहे. पण या वर्षात अवतारने हा रेकॉर्ड मोडून नवा रेकॉर्ड बनवला आहे.

अमिताभ यांना लिव्हर सायरोसिस

बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांचा ब्लॉग हा नेहमीच चर्चेत असतो. आजही तो चर्चेत आहे पण एका वेगळ्या कारणामुळे. गेली कित्येक वर्ष बिग बी लिव्हर सायरोसिस या विकाराने ग्रस्त आहेत.

विशेष म्हणजे हा विकार दारू पिणार्‍यांना होतो. पण दारुचे व्यसन नसतानाही अमितजींना या विकाराशी सामना करावा लागतो आहे. याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणतात, की 1982मध्ये कुली या सिनेमादरम्यान त्यांना मोठा अपघात झाला होता. यावेळी उपचारादरम्यान त्यांना 60 बाटल्या रक्त चढवण्यात आले होते. पण त्यांच्या मते यापैकी एका रक्तदात्याचे दूषित रक्त होते. जे अमितजींना 2002मध्ये समजले. यामुळे या 67वर्षाच्या नायकाला दर तीन महिन्यांनंतर रक्त तपासणी करावी लागते.

शाहीदची बदमाश कंपनी

सध्या एकापाठोपाठ एक फ्लॉप सिनेमे देत असलेला अभिनेता शाहीद कपूर आता लवकरच बदमाश कंपनी या सिनेमातून पहायला मिळणारे. पण यात तो एकटा नसेल तर त्याच्याबरोबर अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि इंडियन आयडल फेम चँगही असेल.

अर्थात सिनेमाच्या नावावरून तरी ही एक बदमाश कंपनी म्हणून सिनेमात पहायला मिळेल. या सिनेमाचे प्रमोशनल साँग नुकतेच रिलीज करण्यात आले. ज्यात शाहीदसोबत इतर तीनही सहकलाकार दिसतात. रब ने बना दी जोडीमध्ये दिल्लीतील एका सर्वसाधारण मुलीची भूमिका साकारल्यानंतर अनुष्का पहिल्यांदाच ग्लॅमरस रोलमध्ये पाहायला मिळेल.

close