‘बॉलिवूडचे दोन भाग झालेत? अजिबातच नाही.’-सलीम खान

October 20, 2016 4:52 PM0 commentsViews:

salim khan20 ऑक्टोबर: ‘बॉलिवूड विभागलेलं नाही. भाषा, धर्म, जातपात या गोष्टींना बॉलिवूडमध्ये स्थान नाही.’ असं ज्येष्ठ पटकथाकार, फिल्म इंडस्ट्रीतले दिग्गज सलीम खान यांनी नुकतंच ट्विट करून सांगितलं.

सध्या पाकिस्तानी कलाकारांवरून बॉलिवूडमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. शिवाय करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’च्या रिलीजवरून अनेक वादविवाद सुरू आहेत. त्यामुळेच ‘बॉलिवूडचे दोन भाग झालेत? अजिबातच नाही.’ असा विश्वास सलीम खान यांनी बॉलिवूडवर व्यक्त केलाय. 80 वर्षांचे सलीम खान पुढे म्हणतात की,’इथे फक्त बुद्धिमत्ता आणि तुमचं काम यालाच महत्त्व आहे. आणि दादासाहेब फाळकेंपासूनच आजपर्यंत हेच सुरू आहे.’ सलिम खान नेहमीच परिपक्व विधानं करण्यासाठी ओळखले जातात. अनेकदा सलमान खाननं केलेल्या चुका त्यांनी निस्तरल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या ट्विटकडे गंभीरपणे पाहिलं जातं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close