हिरानंदानींच्या गॅस उर्जा प्रकल्पाला विरोध

April 27, 2010 11:00 AM0 commentsViews: 1

सचिन चपळगावकर, पुणे

29 एप्रिल

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेजवळ हिरानंदानी ग्रुपचा गॅस ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. पण या प्रकल्पामुळे परिसरात मोठे प्रदूषण होईल, असे सांगत नवलाख-उंब्रे गावातील लोकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे.

प्रकल्पामुळे गावातील ऐतिहासिक मंदीरासोबतच शेती आणि पर्यावरणालाही धोका निर्माण झाल्याची गावकर्‍यांची तक्रार आहे. मात्र या प्रकल्पामुळे प्रदूषण होणार नाही, असा दावा हिरानंदानी ग्रुपकडून करण्यात येत आहे.

या प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनात निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे आणि वारकरी महासंघाचे बंडातात्या कराडकर उतरले आहेत. 280 एकरवरील या गॅस ऊर्जा प्रकल्पाला गावकर्‍यांचा दिवसेंदिवस गावकर्‍यांचा तीव्र विरोध होत आहे.

close