बीडमध्ये ओबीसी मोर्चा

October 20, 2016 7:58 PM0 commentsViews:

20 ऑक्टोबर : बीडला आता ‘मोर्चांचा जिल्हा’ असं म्हणावं लागेल. कारण मराठा मोर्चा, दलित महामोर्चा यानंतर आता बीडमध्येच
आज ओबीसींचा मोर्चा निघाला. मराठा समाजासाठी आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला कोणताच धक्का लागणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी, असा इशारा मोर्चेक•यांनी दिलाय. आज निघालेल्या मोर्चामध्ये एक लाख ओबीसी बांधव सहभागी झाले होते.

बीडच्या जिल्हा क्रीडा संकुलाहून दुपारी बाराच्या सुमाराला हा मोर्चा निघाला. त्यानंतर बीड शहरातला सुभाष रोड, माळीवेस बलभीम चौक, कारंजा मार्ग असा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. जिल्हाधिका•यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाचा समारोप झाला. ओबीसींचा पहिला मोर्चा नाशिकमध्ये 3 ऑक्टोबरला निघाला होता. पण तो छगन भुजबळ यांच्या समर्थनासाठी काढण्यात आला होता. आज मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसींचा मोर्चा निघाला.

कोपर्डी बलात्कार घटनेचा निषेध आणि आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आणि परदेशातही मराठा समाजाचे मोर्चे निघतायत. मुस्लीमधमिर्यांनीही आरक्षणासाठी मोर्चे काढलेत. आणि आता ओबीसी समाजही मोर्चांच्या माध्यमातून एकवटलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close