खासगी जमिनीसाठी वापरला नगरसेवक निधी

April 27, 2010 11:06 AM0 commentsViews: 8

उदय जाधव, आयबीएन लोकमत मुंबई

29 एप्रिल

भांडुपमधील एका नगरसेवकाने आपल्या खासगी जमिनीच्या संरक्षणासाठी चक्क नगसेवक निधीचा वापर केला आहे.

नगरसेवक सुरेश शिंदे यांनी नगरसेवक निधीतून त्यांच्या मालकीच्या जमिनीवर कंपाऊंड वॉल बांधली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब उघड झाली आहे.

भांडुपच्या राम नगरमध्ये राहणार्‍या वसंत पाटील यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.

भांडुपसारख्या उपनगरात रहिवाश्यांना एकीकडे पाणी, आरोग्य आणि विजेचा प्रश्न भेडसावत असताना, स्थानिक नगरसेवक मात्र आपल्या खासगी जमिनींच्या सुरक्षेसाठी जनतेचाच पैसा वापरत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

close