शिवकाशीत फटाक्यांच्या कारखान्याला आग, 8 जणांचा मृत्यू

October 20, 2016 9:22 PM0 commentsViews:

shivkashi4324 
 20 ऑक्टोबर : सगळीकडे दिवाळीचा उत्साह आहे पण तामिळनाडूमधल्या शिवकाशीमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात मोठी दुर्घटना घडलीय. फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू ओढवलाय. यामध्ये 6 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे.

शिवकाशीमधल्या फटाक्यांच्या खाजगी स्कॅनिंग सेंटरमध्ये ही दुर्घटना घडली. हे कामगार फटाक्यांची बंडलं ट्रकमध्ये भरत असताना स्कॅनिंग सेंटरमध्ये आग लागली, तिथे धूर पसरला आणि धुरामध्ये घुसमट होऊन या कामगारांचा मृत्यू ओढवला.

आग लागल्यानंतर या कामगारांनी मदतीसाठी अलार्म कॉल दिला. त्यानंतर खिडक्या तोडून बाकीच्या कामगारांची सुटका करण्यात आली. तिथल्या 41 कामगारांपैकी 15 जणच सुखरूप बाहेर आले पण बाकीचे सगळे जण धुरामुळे बेशुद्ध पडले होते. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. या घटनेनंतर इथे फटाक्यांचे कारखाने चालवणाऱ्यांचे परवाने जप्त करण्यात आलेत. शिवकाशीमधल्या फटाक्यांच्या कारखान्यांत याआधीही अशा दुर्घटना घडून कामगारांचा मृत्यू ओढवलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close