दिल्लीत 11 वर्षांनंतर भारत पराभूत, न्युझीलंडचा 6 धावांनी विजय

October 20, 2016 10:18 PM0 commentsViews:

delhi4320 ऑक्टोबर : कसोटी मालिका गमवल्यानंतर न्युझीलंड टीमला अखेर सूर गवसला आहे. रोमहर्षक सामन्यात न्युझीलंडने भारतावर 6 धावांनी विजय मिळवलाय. न्युझीलंडच्या विजयामुळे तब्बल 11 वर्षांनंतर भारताला राजधानी दिल्लीत पराभवाला सामोरं जावं लागलंय.

फिरोजशहा कोटला स्टेडियमवर न्युझीलंडने दिलेल्या माफक आव्हानापुढे भारताने नांगी टाकली. न्युझीलंडचा कॅप्टन केन विलियम्सने शानदार शतक झळकावत 118 धावा काढल्या. त्याच्या या शतकीखेळीमुळे न्युझीलंडने 242 धावांपर्यंत मजल मारली. 243 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवातच खराब राहिली. 21 धावांवर स्कोअर असताना रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर विराट कोहली अवघ्या 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर एकापाठोपाठ भारताचे स्टार फलंदाज बाद होत गेले. कॅप्टन कुल धोणी आणि केदार जाधवने धावांचा फलक हलता ठेवला. पण, जाधव 41 तर धोणी 41 धावांवर बाद झाले. टीम इंडिया 49.3 ओव्हरमध्ये 236 धावांवर गारद झाली. न्युझीलंडने अवघ्या 6 धावांनी भारतावर विजय मिळवत मालिकेत 1-1ने बरोबरी घेतलीये. दिल्लीमध्ये भारताला तब्बल 11 वर्षांनंतर पराभवाला सामोरं जावं लागलं. एप्रिल 2005मध्ये पाकिस्तानाने भारताला पराभूत केलं होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close