युती सन्मानपूर्वक करावी अन्यथा स्वबळावर लढू – रावसाहेब दानवे

October 21, 2016 3:25 PM0 commentsViews:

danve and sena

21 ऑक्टोबर :  शिवसेनेसोबत युतीबाबत चर्चा करण्यासाठी  आम्ही तयर आहोत. युती सन्मानपूर्वक करावी अन्यथा स्वबळावर लढू असं स्पष्ट मत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं.

पुण्यात भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. शिवसेनेसोबत युती करण्यास आम्ही तयार आहोत. पण ही युती सन्मानपूर्वक व्हावी. तसं नसेल तर स्वबळावर निवडणुका लढवल्या जातील. निवडणुकीनंतर भाजपच क्रमांक एकचा पक्ष असेल असे आत्मविश्वासपूर्वकपणे त्यांनी सांगितलं. जिल्हास्तरावरील नेत्यांना याबाबत सूचना केल्या आहेत. त्यांनी प्रदेश समितीच्या सल्ल्याने निर्णय घ्यावा असंही ते म्हणालेत.

दरम्यान, शिवसनेने मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. गुरूवारी त्यांनी तशा सूचनाच पदाधिकाऱ्यांना गुरूवारी दिल्या. शिवसेना युतीसाठी कोणत्याही तडजोडी आणि आर्जवे भाजपला करणार नसून भाजपने सन्मानजनक प्रस्ताव दिला, तरच चर्चेची तयारी शिवसेनेने ठेवली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close