प्रभा राव यांच्यावर अंत्यसंस्कार

April 27, 2010 12:10 PM0 commentsViews: 6

29 एप्रिल

राजस्थानच्या राज्यपाल प्रभा राव यांच्या पार्थिवावर आज वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील कोल्हापूर-रोहणी या गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

राव यांचे भाचे आणि राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी त्यांना भडाग्नी दिला. पोलीस जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून राव यांना अंतिम सलामी दिली.

यावेळी सोनिया गांधी यांच्या वतीने मोहसिना किडवई उपस्थित होत्या. तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उत्तराखंडच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा, माणिकराव ठाकरे उपस्थित होते.

close