‘पान बहार’च्या जाहिरातीबद्दल जेम्स बाँड पिअर्स ब्रॉसननची माफी

October 21, 2016 4:17 PM0 commentsViews:

pan masala Pierce Brosnan21 ऑक्टोबर: ‘पान बहार’ची जाहिरात केल्याबद्दल पिअर्स ब्रॉसनननं म्हणजेच जेम्स बाँडनं आपल्या भारतीय फॅन्सची माफी मागितलीये. पान मसाला बनवणाऱ्या या कंपनीनं आपली दिशाभूल केल्याचा दावाही त्याने केलाय.

या उत्पादनात कोणतीही तंबाखू , सुपारी किंवा कोणतंही हानीकारक द्रव्य नसल्याचं आपल्याला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे या उत्पादनाची जाहिरात करायला आपण होकार दिला होता. मात्र भारतीय प्रसारमाध्यमातून त्याच्यावर टीका झाल्यानंतर त्याला त्याची चूक उमगली.त्याने आपल्या चाहत्यांची माफी मागितली.

पिअर्स ब्रॉसननने आपल्या माफीनाम्यात असं म्हटलंय की,’पान बहार’ या कंपनीनं माझ्या इमेजचा वापर त्यांच्या पान मसाला  प्रॉडक्टसाठी केला. काही दशकं महिलांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरण जागृतीसाठी काम केल्यानंतर माझ्या हातून असं काही झाल्याचं कळल्यावर  मला अत्यंत दु:ख होत झालं.

आरोग्यास हानीकारक अशा कुठच्याही उत्पादनाची भारतात जाहिरात करण्याचा माझा उद्देश नव्हता. असा कोणताही करार मी केलेला नाही. माझी पहिली पत्नी आणि मुलगी यांचा कॅन्सरनं झालेला मृत्यू ही माझ्या वैयक्तिक आयुष्यातली खूप मोठी हानी आहे. त्यामुळेच महिलांच्या आरोग्यासाठी आणि मानवी आरोग्य सुधारण्याच्या प्रयत्नांना माझा कायम पाठिंबा असतो. माझ्यामुळे या जाहिरातीद्वारे कोणी दुखावले गेले असल्यास मी त्यांची मनापासून माफी मागतो. पिअर्स ब्रॉसनननं उचललेलं हे पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे. पिअर्स ब्रॉसनननं  पाचवा जेम्स बाँड साकारला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


>>

close