जिओ मामिचं शानदार उद्घाटन, अमिताभ,आमिर,अनुरागची उपस्थिती

October 21, 2016 5:02 PM0 commentsViews:

mami-1477033735

मुंबई, 21ऑक्टोबर: जिओ मामि फिल्म फेस्टिवलचं उद्घाटन मोठं शानदार झालं. मामि फिल्म फेस्टिवलचं हे 18वं वर्ष. मामिच्या उद्घाटनाचा नजारा काही औरच होता. बॉलिवूड सिताऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा चांगलाच रंगला.आमिर खान,अमिताभ बच्चन, जया बच्चन, कल्की कोचीन,अनुराग कश्यप, श्याम बेनेगल आणि हुमा कुरेशी असे अनेक स्टार्स मामिच्या उद्घाटनाला हजर होते.

जॅकलीन फर्नांडिस या सोहळ्याची होस्ट होती. रॉयल ऑपेरा हाऊस इथे हा सोहळा रंगला.भारतातल्या या एकमेव ऑपेरा हाऊसमध्ये 23 वर्षांनी कार्यक्रम झाला. आमिर खाननं चीनचे दिग्दर्शक आणि पटकथाकार जिया झँग यांना सिनेमातल्या त्यांच्या कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन गौरवलं, तर जया बच्चन यांनी दिग्दर्शिका, निर्मात्या सई परांजपे यांचा गौरव केला.

यावेळी बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी हा चित्रपट महोत्सव दर वर्षी असाच बहरू दे असं सांगत मामिला शुभेच्छा दिल्या.
मामि फिल्म फेस्टिवलमध्ये देशविदेशातले  175 सिनेमे दाखवले जाणार आहेत. त्यात ऑस्कर नामांकन मिळालेले 13 सिनेमे आहेत. जिओ मामि फिल्म फेस्टिवल 27 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close