छेडछाडीला विरोध केला म्हणून मुलीवर कटरने हल्ला

October 21, 2016 6:14 PM0 commentsViews:

pune_story443पुणे, 21 ऑक्टोबर : छेडछाडीला विरोध केला म्हणून त्याचा राग बाळगून पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर कटरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडलीये. या प्रकरणी आरोपी देवदास मराटेला अटक करण्यात आलीये.

पुण्यातील नाना पेठेत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर कटरनं वार करण्यात आले. या मुलीने आधी टिंगलटवाळी छेडछाड करणाऱ्या आरोपीचा प्रतिकार केला होता. त्यामुळे या आरोपीने राग मनात धरुन मुलीवर हल्ला केला. या मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तीची प्रकृती आता स्थिर आहे. विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये आरोपी देवदास मरटे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान देवदास रस्त्यावरून या मुलीची कशी पाळत ठेवून होता याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. या फुटेजमध्ये तिच्यावर हल्ला करण्याची दृष्य चित्रीत झालेली नसली. तरिही तिचा बदला घेण्यासाठी तो तिचा कसा पाठलाग करत होता ते स्पष्ट दिसतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close