पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी कबट्टीपटू रोहित चिल्लर अटकेत

October 21, 2016 7:21 PM0 commentsViews:

rohit_chilar21 ऑक्टोबर : प्रसिद्ध कबड्डीपटू रोहित चिल्लरच्या पत्नीनं 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याबाबत आता तिचे सासरे पोलिसांना शरण गेलेत. रोहितला पोलिसांनी गुरुवारी रात्रीच अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर त्याची आईचा शोध घेतला जात आहे.

आत्महत्या करण्याआधी ललिता चिल्लरनं 2 तासांची ऑडिया क्लिप रेकॉर्ड करून ठेवली. आपला सासरी कसा छळ होत होता, याचा तपशील तिनं क्लिपमध्ये सांगितलाय. माझे सासरचे खूप पारंपारिक आहेत, आणि लहानसहान गोष्टींवरून ते माझा छळ करायचे. अगदी पदर डोक्यावरून पडला तरी ते मला घालून-पाडून बोलायचे, असंही तिनं म्हटलंय. या प्रकरणी रोहितने फेसबुकवर खुलासा केलाय की माझ्या पत्नीने आत्महत्या का केली हे माझ्यासाठी धक्कादायक आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही की ती मला सोडून गेलीये. मीडियामध्ये माझ्याविरोधात ज्या काही बातम्या दिल्या जात आहे त्या खोट्या आहेत. मी कधीच हुंडा मागितला नव्हता असा दावा रोहितने केलाय. तर त्याची पत्नी ललिताने आत्महत्येपूर्वी आॅडिअोमध्ये रोहितलाच जबाबदार धरलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close