खोतांच्या जमीन बळकावल्या प्रकरणी सुप्रिया सुळेंच्या ट्रस्टची होणार चाैकशी

October 21, 2016 8:09 PM0 commentsViews:

supriya-sule21 ऑक्टोबर : मुंबईतील खोतांच्या जमिनींवर अवैध कब्जा केल्याचा आरोप होतोय. या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. चौकशीच्या या फेऱ्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईतली शाळा देखील अडकली आहे.

450 एकर जमिनीचं हे प्रकरण असून यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पवार फाउंडेशन या पवईतल्या शाळेचाही समावेश आहे अशी याचिका भूषण सामंत यांनी केली होती. अनेक मोठमोठ्या बिल्डर्सचाही यांत समावेश आहे.

खोती Abolition Act 1949 अंतर्गत खोतांच्या जमिनी सरकारकडे जाणं अपेक्षित असताना त्या जमिनी बळकावण्यात आल्या असा आरोप याचिकेत करण्यात आला होता. तसंच सरकारही या जमिनी परत मागत नसल्याचाही याचिकेत आरोप करण्यात आला होता.  या खोतांच्या जमिनी सरकारजमा होणं अपेक्षित असताना काहीजणांनी अवैधपणे या जमिनी बळकावल्याचा आरोप होतोय.

दरम्यान, सुप्रिया सुळेंनी यासंबंधीचे आरोप फेटाळून लावले आहे. आमच्या संस्थेनं कोणतीही जागा बळकावली नसल्याचं त्यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना म्हटलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close