उत्तर जशाच तसं !, भारतीय सैनिकांच्या गोळीबारात पाकचे 7 जवान ठार

October 21, 2016 8:38 PM0 commentsViews:

loc firing421 ऑक्टोबर : पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. मात्र, यावेळी भारतीय जवानांनी जशाच तसे उत्तर दिले. या गोळीबारात 7 पाकिस्तानी जवान ठार झाल्याचा दावा भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी केलाय.

जम्मू-कश्मीरमधील सांबा सेक्टरमधील हिरानगर आणि अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय छावणीवर गोळीबार केला. नेहमी होणाऱ्या या उल्लंघनाला भारतीय सैन्यानं जशाच तसे उत्तर दिले. यात पाकिस्तानचे 7 जवान ठार झाले आहे असा दावा बीएसएफने केला. या कारवाईत बीएसएफचा एक जवान गुरुनाम सिंह जखमी झालाय. हिरानगर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून अधूनमधून गोळीबार सुरू आहे. या आधीही डेरानगर सेक्टर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारतीय जवान जखमी झाला होता. बीएसएफने या कारवाईला सडेतोड उत्तर दिले होते. यात एक पाकिस्तानी जवान ठार झाला होता.

विशेष म्हणजे, सीमारेषेवर हाच जो भाग आहे जिथे गुरुवारी घुसखोरी करण्यासाठी पाक सैनिकांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. याच ठिकाणाहून 5 ते 6 अतिरेक्यांचे थर्मल फोटो समोर आले होते. या घटनेनं गुप्तचर विभागाने हाय अलर्ट जारी केला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close