बीएमसीचे वकिल म्हणता, खड्डे आहेत तर अलिशान कार घ्या !

October 21, 2016 9:25 PM0 commentsViews:

mumbai_palika21 ऑक्टोबर : खड्‌ड्यांचा एवढाचं जर त्रास होत असेल तर आलिशान गाडी घ्या असा युक्तीवादच मुंबई महापालिकेच्या वकिलांनी हायकोर्टात केलाय. त्यामुळे मुंबईतील खड्‌ड्यांच्या प्रश्नावर महापालिका खरंच किती गंभीर आहे समोर आलंय.

मनसेनं खड्डे बुजवा आंदोलन पुकारले होते. मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्याला खड्डयात उभं करून ‘मी या खड्‌ड्याला जबाबदार’असा फलक हातात दिला होता. पालिकेच्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारची वागणूक दिल्याप्रकरणी कोर्टात धाव घेतलीये. आज या याचिकेवर सुनावणी दरम्यान, पालिकेच्या अधिकाऱ्यांना अशी वागणूक दिली जात असेल तर अयोग्य आहे.

प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमुळे क्रिकेट खेळणाऱ्या इंजिनिअर्सचा अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा दावा वकिलांनी केलाय. तर कोर्टाच्या न्यायाधीशांना रस्त्यावर खड्डे वाटत असतील तर त्यांनी चांगल्या सस्पेंशनच्या अलिशान गाड्या खरेदी कराव्या असा अजब सल्ला मुंबई महापालिकेच्या वकिलांनी दिलाय.

मुळात मुंबईतले रस्ते खराब झालेत. हे रस्ते दुरुस्त व्हावेत यासाठी कोर्टकचेरी सुरू आहे. अशावेळी खड्डे दुरुस्त करण्याऐवजी बीएमसी उलट्या बोंबा मारत असल्याचं समोर आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close