ऑनलाईन खरेदी करताना एटीएम कार्ड जपून वापरा !

October 21, 2016 9:42 PM0 commentsViews:

 atm_online_purches21 ऑक्टोबर : ‘तुमच्या एटीएम कार्डचा पिन नंबर बदला’, असा अलर्ट तुम्हाला तुमच्या बँकेकडून मिळालाय का ? तुमचं डेबिट कार्ड सुरक्षित राहावं यासाठी बँका हे मेसेज तुम्हाला पाठवतायत. कारण डेबिट कार्ड्सची सगळी माहिती हॅक करून तुमच्या खात्यातून परस्पर पैसे काढले जातायत तेही चीनमधून.

अशा प्रकारे एचडीएफसी, आयसीआयसीआय, येस बँक, ऍक्सिस बँक आणि एसबीआय या बँकांची 32 लाख एटीएम कार्ड्स हॅक झालीयत. एका देशातून दुसऱ्.ा देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आथिर्क माहितीची चोरी झालीय. ही माहिती व्हिसा आणि मास्टरकार्ड्सचा तपशील वापरून चोरीला गेलीय. त्यामुळे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मास्टरकार्ड आणि व्हिसा या कार्ड नेटवर्क कंपन्यांनी सगळ्या बँकांना याबद्दल खबरदारीचा इशारा दिलाय.

ऑनलाईन शॉपिंग करताना जरा जपून

ऑनलाईन शॉपिंगमध्ये आपण आपलं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरतो. यावेळी तुम्हाला कार्डची गोपनीय माहिती द्यावी लागते. कार्डच्या पाठीमागे उजव्या बाजूला 3 आकडी CVV (Card Verification Value) नंबर असतो. हा नंबर गुप्त ठेवणं गरजेचं असतं. ऑनलाईन शॉपिंगच्या वेळी किंवा बिल भरताना हा नंबर तुम्हाला द्यावाच लागतो. जेव्हा तुम्ही हा नंबर देता तेव्हा तुम्हाला हा नंबर सेव्ह करण्याबाबत विचारलं जातं. मुळात पुढच्या व्यवहाराच्या वेळी तुम्हाला सोईस्कर जावे म्हणून ही विचारणा असते. पण हा नंबर सेव्ह राहिला तर इथंच खरी गळती लागली आहे. नंबर सेव्ह झाल्यामुळे तुमचं कार्ड हॅक होण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंगमुळेही एटीएम कार्डची माहिती चोरी होण्याचा धोका वाढलाय.

एटीएम कार्ड्सचं हे रॅकेट उघड झाल्यानंतर यावेळी दिवाळीसाठी ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांचं प्रमाण कमी झालंय. फ्लिपकार्ट, स्नॅपडील, ऍमेझॉन यासारख्या ऑनलाईन शॉपिंग साईट्सच्या ग्राहकांची संख्या यामुळे घटण्याची शक्यता आहे.

 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close