शीनाच्या हत्येचा कट पीटर मुखर्जीला माहित होता, आरोपपत्र दाखल

October 21, 2016 10:02 PM0 commentsViews:

sheena peter21 ऑक्टोबर : शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयने पुरवणी आरोपपत्र दाखल केलंय. या आरोपपत्रामुळे आधीचा मीडियासम्राट पीटर मुखर्जी चांगलाच अडचणीत आलाय. पीटर मुखर्जी याला शीनाच्या हत्येच्या कटाबद्दल पूर्ण माहिती होती, असं या आरोपपत्रात म्हटलंय.

शीनाच्या खुनानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचण्यात आला. इंद्राणी मुखर्जीने याबद्दलही पीटर मुखर्जीला सगळं सांगितलं होतं, अशीही माहिती पुढे आलीय. यामुळे शीना बोरा हत्याप्रकरणाच्या खटल्याला गंभीर वळण मिळालंय.

शीना बोरा हत्या प्रकरणाची सुनावणी उद्या म्हणजे शनिवारी सीबीआयच्या स्पेशल कोर्टात सुरू होतेय. इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि संजीव खन्ना हे सगळे आरोपी त्यांना जामीन नाकारण्यात आल्यामुळे सध्या तुरुंगात आहेत. शीनाचा भाऊ मिखाईल बोरा हा या प्रकरणातला महत्त्वाचा साक्षीदार आहे.

इंद्राणी मुखर्जी आणि संजीव खन्ना यांनी शीना बोराचा खून करून तिचा मृतदेह रायगडमधल्या जंगलात पुरून ठेवला होता. इंद्राणी मुखर्जीचा कार ड्रायव्हर श्यामवर यांने पोलिसांना या खुनाची माहिती दिल्यानंतर या कटाचा उलगडा झाला. पीटर मुखर्जीचा मुलगा राहुल मुखर्जी यानेही इंद्राणी, संजीव खन्ना आणि शीना यांना बांद्र्याच्या नॅशनल कॉलेजजवळ शेवटचं एकत्र पाहिल्याची माहिती दिली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close