भाजप, डाव्यांचा डाव फसला

April 27, 2010 2:34 PM0 commentsViews: 4

भाजप, डाव्यांचा डाव फसला

29 एप्रिल

कपात सूचनेवरून सरकारला अडचणीत आणण्याचा भाजप आणि डाव्यांचा डाव फसला.

सरकारविरोधातल्या सर्व कपात सूचना मतदानाला ठेवल्यानंतर नामंजूर झाल्या.

पेट्रोलियम पदार्थांचे वाढलेले दर तसेच वाढती महागाई यांचा विरोध करण्यासाठी भाजप आणि डाव्या पक्षांनी लोकसभेत कपात सूचना आणली होती.

पण सरकारच्या बाजूने पुरेसे संख्याबळ असल्याने विरोधकांचा या मुद्द्यावर पराभव झाला. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सरकारला या मुद्द्यावर पाठिंबा दिला.

शिवाय लालू प्रसाद यादव आणि मुलायम सिंग यांच्या पक्षाचे खासदार मतदानाला गैरहजर राहिले. कपात सूचनेच्या बाजूने 201 तर विरोधात 289 मते पडली. त्यामुळे सरकार तरले. त्यामुळे आता अर्थसंकल्पाला मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

270 खासदारांच्या साध्या बहुमताची सरकारला आवश्यकता होती. पाहूया संसदेत सरकारचे संख्याबळ कसे होते…

सरकारच्या बाजूचे संख्याबळ – 267

काँग्रेस – 207

तृणमूल काँग्रेस – 19

द्रमुक – 18

राष्ट्रवादी काँग्रेस – 9

नॅशनल कॉन्फरन्स – 3

मुस्लीम लीग – 2

एमआयएम – 1

इतर – 8

बहुजन समाज पक्ष – 21

मतदानाला गैरहजर – 27

समाजवादी पक्ष – 23

राजद – 4

विरोधातील मतदान – 225

एनडीए – 158

डावे – 24

बिजू जनता दल – 14

अण्णाद्रमुक – 9

तेलुगु देसम – 6

इतर – 14

close