…यांच्यापेक्षा दिलदार शत्रू बरा -उद्धव ठाकरे

October 22, 2016 4:52 PM0 commentsViews:

uddhav_3452fपणजी, 22 ऑक्टोबर : ब्रिक्स परिषदेत मोदी म्हणाले की 2 नव्या मित्रांपेक्षा 1 जुना मित्र बरा, पण देशात तुम्ही जुन्या मित्रांना कशी वागणूक देताय याचा विचार करा. आता आम्ही साधी भोळी माणसं आम्हाला कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचा उल्लेख न करता घणाघाती टीका केली.

गोव्याच्या रणधुमाळीत आज शिवसेनेनं प्रचाराचा नारळ फोडला. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना भाजपवर एकच हल्लाबोल केला. स्वतःचा फायदा असेल तर युती करतात, फायदा नसेल तर युती करत नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. तसंच ब्रिक्स परिषदेत मोदी म्हणाले की 2 नव्या मित्रांपेक्षा 1 जुना मित्र बरा, पण देशात तुम्ही जुन्या मित्रांना कशी वागणूक देताय याचा विचार करा, उलट आम्ही देशातील साधीसुधी माणसं आहोत. आम्हाला कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा अशी बोचरी टीकाही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यालाही त्यांनी हात घातला. पाकव्याप्त काश्मीर काय, अख्खा पाकिस्तान मिळवा, तरच 56 इंचाची छाती आहे हे सिद्ध होईल, असं आव्हानही उद्धव यांनी नरेंद्र मोदींना दिलं.

सर्जिकल स्ट्राईकवर अविश्वास काहीजण दाखवतायेत. तर काहीजण त्याच सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय देखिल घेतायेत. पण ते श्रेय आपल्या सैन्याचं आहे. निवडणुका येतात आणि जातात.पण आधी पाकिस्तानची वळवळ बंद करा असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच शिवसेना हा अस्सल भगवा आहे. गोव्यात शाखा उघडा मी त्या शाखेत भेट द्यायला येतो.जसं मी मुंबईत करतोय. तसं मी गोव्यात करेन अस आश्वासनही उद्धव ठाकरेंनी दिलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close