समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

October 22, 2016 4:40 PM0 commentsViews:

akhilesh_yadav22 ऑक्टोबर : उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत समाजवादी पक्षात यादवी माजली आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बंडाचे झेेंडे फडकावले आहे. वरीष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव यांच्या अतिशय जवळचे आणि त्यांचे काका रामगोपाल यादव यांनी निवडणूक आयोगात नवीन पक्षाच्या प्रक्रियेची चौकशी केल्याची माहिती मिळतेय.

समाजवादी पक्षात सुरू असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाची कार्यकारणी बैठक लखनौमध्ये सुरू आहे. पण या बैठकीला मुख्यमंत्री अखीलेश यादव यांनी दांडी मारली. काल जिल्हाध्यक्षाच्या बैठकीतही अखीलेश यादव अनुपस्थित राहिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव यांच्या या वर्तनावर पक्षाध्यक्ष मुलायम सिंग यादव प्रचंड नाराज आहेत. पक्षातील काही वरीष्ठ नेत्यांनी अखीलेश यादव यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही केलाय. काही दिवसांपूर्वी अखीलेश यादव यांच्या विरोधात त्यांची सावत्र आई षड्‌यंत्र करत आहे असा आरोप करणारे अखिलेश समर्थक आमदार उदयवीर यांची आज पक्षानं हकालपट्टी केलीय. निवडणुकीच्या आधी समाजवादी पक्षातलं हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close