संसदेचं अधिवेशन सोमवारपर्यंत स्थगित

October 17, 2008 1:01 PM0 commentsViews: 5

17 ऑक्टोबर, दिल्लीसंसदेचं आजपासून सुरू होणारं अधिवेशन सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. दिवंगत संसद सदस्यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं. अधिवेशनात महागाई, जातीय दंगली आणि दहशतवादाच्या मुद्यावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील तर गेली चार वर्षे सरकारला साथ देणारे डावे पक्षही यंदा विरोधी बाकावर बसलेले दिसणार आहेत.अणुकराराच्या मुद्यावरून ते सरकारला जाब विचारतील. गेल्या वेळी तांत्रिक कारणाचं निमित्त देत सरकारनं हिवाळी अधिवेशन लांबणीवर टाकलं होतं.अणुकरार झाल्यानंतर संसदेचं हे पहिलचं अधिवेशन होत असल्यानं परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे. पाच राज्यात विधानसभा निवडणुका घोषित झाल्यानं अधिवेशनाचा कालावधी कमी होण्याचीही शक्यता आहे. या अधिवेशनात एकूण 39 विधेयकं मांडले जाण्याची शक्यता आहे.

close