राजस्थान रॉयलकडून खुलासा

April 27, 2010 2:53 PM0 commentsViews: 2

29 एप्रिल

आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत राजस्थान रॉयल्स टीम उभी करताना आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी केला होता. त्यानंतर आज राजस्थान रॉयल्स टीमने अधिकृत पत्रक काढून या आरोपांचा खुलासा केला.

2008मध्ये इमर्जिंग मीडियाचे मनोज बदाळे यांनी राजस्थान टीम विकत घेतली. पण मनोहर यांनी काल बैठकीनंतर बोलताना बोली लावण्याची प्रक्रिया पारदर्शक नसल्याची टीका केली होती.

शिवाय बॉलिवूड स्टार शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंदरा टीमचे स्टेकहोल्डर्स असल्याचा कोणताही पुरावा नाही, असा आरोपही मनोहर यांनी केला.

त्यानंतर आज बदाळे यांनी अधिकृत पत्रकात टीमचे सगळे स्टेक होल्डर्स आणि भागीदारीतला त्यांचा हिस्साही स्पष्ट केला आहे.

close