देशात पुन्हा असहिष्णुता दिसू लागलीय – रतन टाटा

October 23, 2016 4:59 PM0 commentsViews:

Ratan Tata, Chairman of Tata Sons, participates in a panel discussion titled "Enhancing Access to Modern Technology," at the Clinton Global Initiative, in New York

23 ऑक्टोबर : ‘असहिष्णुता हा एक शाप आहे आणि गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशात असहिष्णुता पुन्हा दिसू लागली आहे’, अशा शब्दांत प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी असहिष्णुतेच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करून हा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला आहे.

ग्वाल्हेर इथे काल (शनिवारी) शिंदे स्कूलचा ११९ वा स्थापनादिन सोहळा पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी देशातील असहिष्णुतेच्या वातावरणावर बोट ठेवले.

असहिष्णुता म्हणजे नेमकं काय आहे; आणि याचा उगम कोठे आहे, या प्रश्‍नांची उत्तरे माझ्या मते प्रत्येकालाच माहिती आहेत. गेल्या काही काळापासून हा शाप पहावयास मिळतो आहे. देशातील लक्षावधी नागरिकांप्रमाणेच कोणालाही या देशात असहिष्णुता असू नये, असं वाटणं स्वाभाविक आहे, असं टाटा म्हणाले.

 आपल्या देशातील नागरिकांना एकमेकांवर प्रेम करता यावे, अशा वातावरणात रहावयाची आमची इच्छा आहे. देशातील नागरिकांना वेठीस न धरता परस्पर देवाणघेवाणीवर आधारित वातावरण असावयास हवे, असं टाटा म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close