कॅन्सरच्या निदानात स्मार्टफोनची मदत

October 23, 2016 4:31 PM0 commentsViews:

la-fi-tn-iphone-app-diagnose-skin-cancer-20140508

23 ऑक्टोबर: सध्या आपलं अख्खं जगच स्मार्टफोनवर आलंय. स्मार्टफोनमध्ये वेगवेगळी ऍप विकसित केली जातात. पण आता स्मार्टफोनमध्ये एक छोटी प्रयोगशाळा तयार करण्यात आलीय. त्यामुळे हा स्मार्टफोन डॉक्टरांना कॅन्सरच्या निदानासाठी मदत करू शकतो.

कॅन्सरचं लवकर निदान करण्यासाठी संशोधकांनी बायोडिटेक्टशन टेक्नॉलॉजी शोधून काढलीय. हीच टेक्नॉलॉजी या स्मार्टफोनमध्ये वापरण्यात आलीय. यामध्ये बायोप्सीमार्फत ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, लिव्हर कॅन्सर अशा कॅन्सरचं निदान होऊ शकतं. ज्या क्लिनिकमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये मोठी प्रयोगशाळा नसते त्याठिकाणी डॉक्टर्स आणि कॅन्सर सर्जन हा स्मार्टफोन नेऊ शकतात.

अर्थात या स्मार्टफोनला काही मर्यादा आहेत. कारण त्यावर एका वेळी एकाच पेशंट्सच्या पेशींचे नमुने तपासले जाऊ शकतात. तरीही एक प्रयोग म्हणून याकडे पाहिलं जातंय. अमेरिकेतल्या वॉशिंग्टन स्टेट युनिव्हसिर्टीमध्ये हे संशोधन झालंय. आणि यावर संशोधन करणारे प्रा. ले ली यांनी या तंत्रज्ञानाचं पेटंटही घेतलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close