हेरगिरी करणार्‍या महिला अधिकार्‍याला अटक

April 27, 2010 3:58 PM0 commentsViews: 2

29 एप्रिल

इस्लामाबादमधील भारतीय दूतावासातील एका महिला अधिकार्‍याला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मधुरा गुप्ता असे या अधिकार्‍याचे नाव आहे. 2007 पासून त्यांनी पाकिस्तानला गोपनीय कागदपत्रे दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

त्यांना इस्लामाबादहून बोलावून घेण्यात आले. आणि शुक्रवारी दिल्लीत अटक करण्यात आली. भारतीय दूतावासात उर्दू दुभाषी म्हणून त्या पत्रकारिता आणि माहिती विभागात काम करत होत्या.

आयएसआयशी त्यांचे संधान असल्याचे बोलले जात आहे. दुसरे एक अधिकारी आर. के. शर्मा स्कॅनरखाली आहेत. शर्मा हे आर्थिक आणि व्यावसायिक विभागात काम करतात.

close