पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, एक जवान शहीद

October 24, 2016 9:36 AM0 commentsViews:

pakistan ceasefire voilation

24 ऑक्टोबर : पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकच्या सैन्याने काल रात्री जम्मू-काश्मीरमधील आरएसपुरा, पुलवामा, पर्गवाल आणि अखनूर सेक्टरमधील बीएसएफच्या चौक्यांवर गोळीबार केला. यामध्ये बीएसएफचा एक जवान शहीद झाला, तर 2 नागरिकांचा मृत्यू झाला.

सुशील कुमार असं शहीद जवानाचं नावं आहे. सीमेलगत आरएसपुरा सेक्टरमध्ये काल रात्रीपासून पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात ते जखमी झाले होते. जखमी झाल्यानंतर त्यांना रात्री सरकारी वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज पहाटे उपचारादरम्यान सुशीलकुमार यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, पाकिस्तानने काल रात्री आरएस पुरासह पुलवामा, पर्गवाल आणि अखनूर इथल्या  बीएसएफच्या 20 चौक्यांवर हल्ला झाला, तर लष्कराच्या 15 चौक्यांवर गोळीबार केला. पुलवामाच्या सिरनू  इथल्या अल्पसंख्याकाच्या घरांचे रक्षण करणाऱ्या बीएसएफच्या चौकीचाही यामध्ये समावेश आहे. पाकिस्तानी सैन्याने याठिकाणी जोरदार गोळीबार केला. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा लागला होता. तर पर्गवाल सेक्टरमध्येही पाकिस्तानकडून उखळी तोफांचा मारा करण्यात आला. भारतीय सैन्याकडून पाकच्या या आगळिकीला चोख प्रत्युत्तर देण्यात आले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close