गाडी घेताय! आता EMI वाढणार

October 24, 2016 11:38 AM0 commentsViews:

Maruti-Suzuki-Premium-Nexa-Showroom

24 ऑक्टोबर: दिवाळीत कार घेण्याचं प्लॅनिंग करताय? आणि अजून तुम्ही कार बुक केली नसेल तर आता तुम्हाला ती महाग पडेल.राज्यात नव्या गाडीखरेदीवर रस्ते सुरक्षा अधिभार आजपासून लागू होणार आहे, त्यामुळे आता गाड्यांच्या खरेदीत तुमच्या बजेटवर अधिकचा भार पडेल.

दुचाकी,तीनचाकी आणि चारचाकी वाहनांवर हा कर 2 टक्के असून तो खरेदीच्या वेळी एकदाच वसुल केला जाईल. हा उपकर 2 ते 10 टक्के असा प्रत्येक गाडीप्रमाणे वेगवेगळा असेल.

मालवाहू लाईट मोटर व्हेइकल या श्रेणीतल्या गाड्यांवर 4 टक्के हा कर आकारला जाईल.राज्यात स्थालांतरीत गाड्यांवरही हा कर लावला जाणार आहे. 7 आसनी गाड्यांवर तो 5 टक्के असेल.

रस्ते सुरक्षा समितीने दिलेल्या अहवालानुसार रस्ता सुरक्षा निधीची स्थापना करण्यात आलीय. रस्ता सुरक्षा निधीसाठी मोटर वाहन कर अधिनियम 1958मध्ये बदल करून हा कर वसुल करण्यात येतोय.या रस्ता सुरक्षा निधीमधून अपघात नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close