ऐश्वर्या मनानं तेवढीच सुंदर- अनुष्का

October 24, 2016 12:13 PM0 commentsViews:

24 ऑक्टोबर : सिनेमात जेव्हा दोन चांगल्या अभिनेत्री एकत्र काम करतात तेव्हा त्यांच्यात तणाव निर्माण होतो, असा एक समज आहे. पण ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शर्मा यांनी हा समज खोटा ठरवलाय. जिओ मामिमध्ये ऐ दिल है मुश्किलच्या कलाकारांनी मीडियाशी संवाद साधला. तेव्हा अनुष्का शर्मानं ऐश्वर्याचं भरभरून कौतुक केलं. ती किती प्रेमळ आहे ते सांगितलं. ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमात रणबीर कपूरसोबत ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शर्मा या आघाडीच्या नायिका आहेत म्हटल्यावर अनेक गॉसिप्स ऐकायला मिळतील, सेटवर दोघींचे वाद, भांडणं पाहायला मिळतील असं ज्यांना वाटलं होतं त्यांची सपशेल निराशा झाली.

करण जोहर म्हणाला, सिनेमात दोघींचा एकच सिन आहे. आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे. पण सिनेमात दोघी वेगवेगळ्या झोनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांची टक्कर अशी नाही. जिओ मामि फिल्म फेस्टिवलमध्ये बोलताना अनुष्का शर्मानं ऐश्वर्या रायसोबतचा एक अनुभव सगळ्यांशी शेअर केला. अनुष्का म्हणाली, ‘2010मधली ही घटना. मी तेव्हा नुकतीच सिनेमात आले होते. आणि त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी मला त्यांच्या घरी पार्टीला बोलावले होते. मी माझ्या आईबरोबर गेले आणि तिथे उपस्थित असलेल्या सेलिब्रिटीज पाहून एकदम हरखून गेले होते. तेव्हा ऐश्वर्या स्वत: माझ्याकडे आली आणि तिनं मला ड्रिंक ऑफर केलं. अख्खा वेळ मला तिथं कम्फर्टेबल वाटेल याची काळजी तिनं घेतली. ती खूप प्रेमळ आहे. बाहेर जेवढी सुंदर आहे, तेवढीच आतूनही सुंदर आहे.’

यावर ऐश्वर्या राय बच्चन म्हणाला, ‘ मी काही फार मोठं केलं नाही. अनुष्का एकदम लाजाळू होती. आणि एक होस्ट म्हणून मला तिला कम्फर्टेबल वाटेल असं वागायलाच हवं होतं.’ सध्या ‘ऐ दिल है मुश्किल’चं प्रमोशन जोरात सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कलाकारांशी गप्पा रंगतात. मग त्यांचे वेगवेगळे पैलू समोर येतात. सिनेमा 28 ऑक्टोबरला रिलीज होतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close