सोरेन सरकार धोक्यात

April 28, 2010 9:50 AM0 commentsViews:

28 एप्रिल

भाजपने पाठींबा काढून घेतल्याने झारखंडमधील सोरेन सरकार धोक्यात आले आहे. यामुळे आता झारखंडमधील सोरेन सरकार कोसळण्याची शक्यता आहे.

सोरेन यांनी काल कपात सूचनेच्या वेळी यूपीए सरकारच्या बाजूने पाठींबा दर्शवला होता. त्यामुळे भाजपने हे पाऊल उचलल्याचे समजते.

झारखंड विधानसभेतील बलाबलावर एक नजर टाकूयात…

विधानसभा सदस्य – 81

बहुमतासाठी गरज – 41 मते

जेएमएम – 18

भाजप – 20

एजेएसयू – 05

काँग्रेस -25

इतर – 13

बहुमतासाठी 41 जागा आवश्यक आहेत. बदललेल्या परिस्थितीत काँग्रेसने सोरेन यांना पाठिंबा दिल्यास बहुमताचा आकडा सहज पार होऊ शकतो.

या बलाबलावर एक नजर टाकूयात….

जेएमएम – 18 + भाजप – 20 = 38

जेएमएम – 18 + काँग्रेस – 25 = 43

close