मी नवीन पक्ष काढणार नाही – अखिलेश यादव

October 24, 2016 2:05 PM0 commentsViews:

akhilesh-yadavaasd

24 ऑक्टोबर: मी नवीन पक्ष काढणार नाही, मी नवीन पक्ष काढणार अशी लोकांमध्ये चर्चा होती. मात्र, मी कोणत्याही स्थितीत नवीन पक्ष काढणार नसल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी स्पष्ट केलं आहे.

समाजवादी पक्षातील अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर लखनऊ येथील सपाच्या मुख्यालयात याबाबतची पुढील रणनितीविषयीची महत्त्वाची बैठक सुरु करण्यात आली आहे. यावेळी अखिलेश म्हणाले, नेताजींनी आम्हाला अन्याय विरोधात लढायला शिकवले. नेताजींनी राजीनामा द्यायला सांगितला तर मी राजीनामा देईन. मला जेव्हा दुसऱ्यांकडून समजलं की, तुम्ही मला पदावरुन हटवणार आहात, तेव्हा मला दुःख झालं, हा तुमचा पक्ष आहे. यात माझं काहीही नाही, असं भावनिक वक्तव्यही अखिलेश यांनी केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close