अमरसिंह आणि शिवपाल यांना सोडू शकत नाही -मुलायम सिंह यादव

October 24, 2016 3:48 PM0 commentsViews:

Mulyamsinghh yadav

24 ऑक्टोबर: अखिलेश यादव यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवणार नाही असं स्पष्ट करत शिवपाल यादव आणि अमरसिंह यांची साथ सोडणार नाही असं समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी अखिलेश यांना ठणकावून सांगितलं आहे. अखिलेश आणि मुलायमसिंह यांचे बंधू शिवपाल यादव यांच्यात पक्षांतर्गत संघर्ष वाढत असताना याबाबत स्वतः मुलायमसिंहांनी आपल्या भावाची पाठराखण केली.

लखनऊमध्ये आज (सोमवारी) समाजवादी पक्षाची बैठक पार पडली. त्यात त्यांनी कुटुंबातील एकमेकांशी भांडत आहोत हे दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसंच, जो टीका सहन करु शकत नाही तो कधीच मोठा नेता बनत नाही असं सूचक वक्तव्य करत त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. त्याचबरोबर, तुमच्या हाती सत्ता आली आणि आता त्याची हवा तुमच्या डोक्यात पोहोचली आहे असे खडेबोलही त्यांनी अखिलेश यादव यांना सुनावलेत.

शिवपाल यादव हे जनतेचे नेते आहेत असेही मुलायमसिंह यांनी यावेळी स्पष्ट केलं. तर अमरसिंहाचे कौतुक करताना मुलायमसिंह म्हणाले, अमरसिंह यांनी मला वाचवले आहेत. मी शिवपाल आणि अमरसिंहाना कधीच सोडू शकत नाही असंही मुलायमसिंह यांनी नमूद केलं. त्यामुळे अमरकथेवरून सुरु झालेली यादवी इतक्यात संपेल असं दिसत नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close