कापूस निर्यातीवर बंदी

April 28, 2010 10:25 AM0 commentsViews: 2

28 एप्रिल

वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्याचे कारण सांगत, कापसाच्या निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

याचा फटका राज्यातील शेतकर्‍यांनाही बसणार आहे.

यावर्षी देशात सुमारे 292 लाख कापूस गाठींचे उत्पादन झाले आहे. आणि त्यापैकी 80 लाख गाठींची निर्यातीसाठी नोंदणी झाली होती. पण आता मात्र सरकारने बंदी घातल्याने निर्यातदारांना याचा फटका बसणार आहे.

कापसाच्या देशांतर्गत वाढणार्‍या किंमती रोखण्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

कापसाच्या उत्पादनाची आकडेवारी आणि वस्तुस्थिती पाहूयात…

देशात यावर्षी 292 लाख गाठी कापसाचे उत्पादन

आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाच्या उत्पादनात घट

भारताच्या कापसाला जगभरातून जोरदार मागणी

भारतीय कापूसउत्पादक शेतकर्‍यांना मोठा फायदा

प्रतिक्विंटलला सुरुवातीला 3,200 रु. दर

दुबार वेचणीलाही 3, 400 रुपयांचा दर

शेतकर्‍यांकडे अजूनही कापूस शिल्लक

close