उत्तर प्रदेशच्या आखाड्यात प्रियांका गांधींची एंट्री

October 24, 2016 5:19 PM0 commentsViews:

 priyanka_gandhi3

24 ऑक्टोबर : लोकसभा निवडणुकानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाने खचलेल्या काँग्रेसने अखेर ‘प्रियांकास्त्र’ उपसले आहे. प्रियांका गांधी आता उत्तर प्रदेशच्या राजकारणात एंट्री करणार आहे. 19 नोव्हेंबरपासून त्या अलाहाबादपासून निवडणुकीचा प्रचार सुरू करतील. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीबद्दल आज काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीला प्रियांका गांधीही उपस्थित होत्या.

प्रियांका गांधींनी उत्तर प्रदेशात टप्प्याटप्प्याने प्रचार करावा, अशी काँग्रेसचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांची इच्छा होती. प्रियांकांनी बुंदेलखंड, अवध, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्वांचल अशा भागात प्रचार करावा, असं त्यांचं म्हणणं होतं. पण प्रियांका गांधी या राज्यात सरसकटपणे प्रचारात उतरणार आहेत.

उत्तरप्रदेश निनडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसने 2019 च्या निवडणुकांचं लक्ष्य ठरवलंय. यासाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींवर काँग्रेसचा भर आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष जिवंत करायचा आणि 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस नंबर 1 चा पक्ष करायचा, असा काँग्रेसच्या नेत्यांचा विचार आहे.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी मागच्या महिन्यात उत्तर प्रदेशात किसान रॅली केली. या रॅलीमध्ये शेतक•यांकडून त्यांच्या तपशीलाबद्दलचे फॉर्म भरून घेण्यात आले. शेतकऱ्यांच्या माध्यमातून ओबीसी मतदारांपर्यंत पोहोचायचं, अशी काँग्रेसची रणनीती आहे. त्यासोबतच काँग्रेसला उत्तर प्रदेशातले परंपरागत ब्राम्हण मतदार पुन्हा आपल्याकडे ओढून घ्यायचे आहेत. मुस्लीम मतदारांवरही काँग्रेसचा भर राहणार आहे.

निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पक्षामध्ये यादवी माजलीय. या स्थितीत अखिलेश यादव यांनी वेगळा पक्ष काढलाच तर अखिलेश यादव यांच्याशी युती करता येईल का? या शक्यतेवरही काँग्रेस विचार करतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close