नाशिकमध्ये गुंडांचा उच्छाद

April 28, 2010 10:36 AM0 commentsViews: 1

28 एप्रिल

नाशिकमध्ये गुंडांनी उच्छाद मांडला आहे. नाशिकच्या उपनगरात मध्यरात्री एक बंगला आणि गाडी जाळण्यात आली आहे.

इच्छामणी गणपती मंदिराजवळ राहणार्‍या अजित अहुजा यांचा हा बंगला आहे. त्यांची पत्नी, आई आणि मुले घरात असताना एका टोळक्याने घरात घुसून हा प्रताप केला.

घरभर रॉकेल टाकून लावलेल्या या आगीत घरातील सर्व वस्तू आणि दारात उभी असलेली कार जळून खाक झाली.

यात अहुजा यांच्या पत्नीचे हात भाजलेत. तर वृद्ध आईच्या डोक्याला मार बसलाय.

त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. स्वप्नील समेळ नावाच्या इसमाने हे काम केल्याची अहुजांची तक्रार आहे.

close