दिवाळीपूर्वीच टाटा समुहात फुटले ‘फटाके’, सायरस मिस्त्रींना हटवलं

October 24, 2016 5:45 PM0 commentsViews:

tata_sairas24 ऑक्टोबर : दिवाळीपूर्वीच टाटा समुहात ‘फटाके’ फुटले आहे. टाटा सन्सचे चेअरमन सायरस मिस्त्री यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलंय. आता पुन्हा एकदा रतन टाटा चेअरमनपदाचा कारभार पाहणार आहे. टाटा सन्स ही टाटा उद्योगसमुहाची होल्डिंग कंपनी आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळाची आज बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

टाटा सन्सच्या नियमावलीप्रमाणे नवीन चेअरमनची निवड करण्यासाठी निवड समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये रतन टाटा, वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोनेन सेन आणि लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश आहे. चार महिन्यांमध्ये नवीन चेअरमनची निवड करण्याची जबाबदारी या समितीवर टाकण्यात आली आहे. तोपर्यंत रतन टाटा हेच हंगामी चेअरमन म्हणून काम पाहणार आहेत. टाटा सन्सनं निवेदन प्रसिद्ध करून यासंबंधी माहिती दिली, तोपर्यंत या घडामोडींचा बाहेर कुणालाही सुगावा लागला नव्हता. त्यामुळेच आज ही बातमी आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलाय. डिसेंबर 2012मध्ये सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close