शेवेचे लाडू आणि नात्याचा गोडवा, डोंगरपट्‌ट्यातील पारंपारिक दिवाळी !

October 24, 2016 7:56 PM0 commentsViews:

शशी केवडकर, बीड 24 ऑक्टोबर : राज्यभरात जशी दिवाळीची तयारी सुरू आहे. तशीच तयारी सुरू आहे बीडच्या डोंगरपट्‌ट्यावर..वंजारवाडी या गावात महिलांची फराळाची लगबग सध्या जोरात सुरू झालीये.

beed_diwali43वंजारवाडी गावातलं हे तांदळे कुटुंब..या कुटुंबातली दोन मुलं गावापासून दूर असतात. तर त्यांचे मोठे भाऊ शेती करतात. बाहेर असलेले हे दोन्ही भाऊ दिवाळीसाठी सध्या घरी आलेत. दरवर्षी हे कुटुंब दिवाळी एकत्रच साजरी करतं. या घरातल्या महिलासुद्धा खमंग फराळ बनवायला सज्ज झाल्या आहेत…

खरंतर दिवाळीत पारंपारिक पदार्थ बनवून दिवाळीचा फराळ बनवला जातो. पण डोंगरपट्‌ट्यात खूप गोड खायची सवय आहे. त्यामुळे शेवेचे लाडू हे या भागात मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. हे लाडू पाहून तुमच्या तोंडालाही नक्कीच पाणी सुटलं असणार तर मग या शेवेच्या लाडूची रेसीपी सागंतायत या कुटुंबातल्या मीरा तांदळे..

मात्र या फराळाची लज्जत तेव्हाच येते जेव्हा घरच्यांकडून पसंतीची पावती मिळते.. खरेदी, फटाके, फराळ या सगळ्याबरोबर नात्यांची जपणूक हाच ख-या अर्थाने आपला दीपोत्सव आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close