सायरस मिस्त्रींना का हटवलं ?

October 24, 2016 9:19 PM0 commentsViews:

ratan_tata_news24 ऑक्टोबर : प्रख्यात उद्योगपती रतन टाटा 50 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर डिसेंबर 2012 मध्ये निवृत्त झाले होते आणि आपल्यावर असलेली 100 अब्ज डॉलरचा हा डोलारा सायरस मिस्त्री यांच्यावर सोपवला होता. पण हा डामडोलारा सायरस मिस्त्री सांभाळू शकले नाही. त्यामुळे चारच वर्षांत त्यांना हटवण्यात आलंय. विशेष म्हणजे रतन टाटा यांचे वारसदार म्हणून सायरस मिस्त्रींकडे पाहिलं जात होतं. पण आताही मिस्त्री अपयशी ठरलेत.

दीडशे वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेला टाटा उद्योग समूह…भारत आणि भारताबाहेर उद्योजक जगतात आपला ठसा उमटवणारी नावाजलेली भारतीय कंपनी. टाटाचे सर्वेसर्वा जेआरडी टाटा यांनी रतन टाटांची चेअरमनपदी नियुक्ती केली होती. जेआरडींनी सोपवलेली जबाबदारी रतन टाटांनी लिलया सांभाळली. रतन टाटा हेच जेआरडींचे वारसदार असल्याचं ही रतन टाटांनी सिद्ध करून दाखवलं. कोरस, जग्वार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. एवढंच नाहीतर इंडिगो आणि नॅनो ची निर्मितीही केली.

पण आधीच ठरवल्याप्रमाणे रतन टाटांनी वयाच्या 75 व्या वर्षी 2012 निवृत्ती घेतली. आणि आपला वारसदार म्हणून सायरस मिस्त्री यांच्याकडे आता टाटा समुहाची धुरा सोपवली. मात्र सायरस मिस्त्री रतन टाटांचे वारसदार ठरू शकले नाही. विशेष म्हणजे टाटा समुहात पहिल्यांदाच कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीची निवड झाली होती. पण हा डोलारा मिस्त्री सांभाळू शकले नाही. चेअरमनपदी त्यांची कामगिरी समाधानकारक नव्हती.ज्यावेळी मिस्त्रींना चेअरमनपदाची धुरा सांभाळली तेव्हा 2012 मध्ये टाटा ग्रुपची उलाढाल 100 अब्ज डॉलर्स इतकी होती. 2021 पर्यंत टाटा ग्रुपची उलाढाल 500 अब्ज डॉलर्सवर नेण्याचं उद्दिष्ट होते. पण सायरस मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली हे उद्दिष्ट गाठण्याच्या वेगाने टाटा ग्रुपची प्रगती झाली नाही.

एवढंच नाहीतर रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात गेल्या 6 महिन्यांपासून मतभेद होते. आणि टाटा ग्रुपच्या शेअरधारकांमध्ये विश्‍वास निर्माण करण्यात सायरस मिस्त्री अपयश आले होेते. शेअरधारकांनी सायरस मिस्त्रींना चेअरमनपदावरून हटवण्याच्या बाजूने मत दिलं होतं. त्यामुळेच सायरस मिस्त्री यांना पदावरुन हटवण्यात आलं. विशेष म्हणजे या बातमीबाबत टाटा समुहाने कमालीची गुप्तता बाळगली.

सायरस मिस्त्रींना पदावरून का हटवलं ?

सायरस मिस्त्री यांची चेअरमन म्हणून समाधानकारक कामगिरी नाही
सायरस मिस्त्री यांची 2012 मध्ये टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी नेमणूक
2012 मध्ये टाटा ग्रुपची उलाढाल 100 अब्ज डॉलर्सची
2021 पर्यंत टाटा ग्रुपची उलाढाल 500 अब्ज डॉलर्सवर नेण्याचं उद्दिष्ट
सायरस मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली हे उद्दिष्ट गाठण्याच्या वेगाने टाटा ग्रुपची प्रगती नाही
रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात गेल्या 6 महिन्यांपासून मतभेद
टाटा ग्रुपच्या शेअरधारकांमध्ये विश्‍वास निर्माण करण्यात सायरस मिस्त्री यांना अपयश
शेअरधारकांनी सायरस मिस्त्रींना चेअरमनपदावरून हटवण्याच्या बाजूने दिलं मत
सायरस मिस्त्री हे टाटा ग्रुपचे सहावे चेअरमन
सायरस मिस्त्री हे आधी शापूरजी पालनजी या कंपनीचे संचालक होते.

सायरस मिस्त्री यांच्याबद्दल

- 4 जुलै 1968 मध्ये जन्म- लंडनमधल्या इम्पिरिअल कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरींगची पदवी
– लंडन बिझनेस स्कूलमधून एमबीए ए सायरस मिस्त्री हे पालोनजी मिस्त्री यांचा धाकटा मुलगा
– पालोनजी यांचे टाटा सन्समध्ये सर्वाधिक शेअर्स आहेत
– ऑगस्ट 2006 पासून ते टाटा सन्सच्या संचालक मंडळात


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close