मनसे तोडपाणी तर भाजप गुन्हेगारीतून पापमुक्त होणारा पक्ष,अजित पवारांचं टीकास्त्र

October 24, 2016 10:25 PM0 commentsViews:

ajit_pawar--621x41424 ऑक्टोबर : गुन्हेगारी जीवनात तुम्ही आयुष्यभर केलेली पाप धुऊन तुम्हाला पवित्र होता येतं असं ठिकाण म्हणजे भारतीय जनता पक्ष असल्याची बोचरी टिका, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलीये. तसंच मनसे हा तोडपाणी करणारा पक्ष आहे असा आरोपही अजित पवारांनी केला.

पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीला लागलेली गळती रोखण्यासाठी आज अजित पवार यांनी एक पक्षांतर्गत मेळावा घेतला होता. या मेळाव्यानंतर मीडियाशी बोलतांना अजित पवार यांनी भाजपमध्ये होत असलेल्या गुंडांच्या प्रवेशांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. गुन्हेगारी जीवनात तुम्ही आयुष्यभर केलेली पाप धुऊन तुम्हाला पवित्र होता येतं असं ठिकाण म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे अशी टीका अजितदादांनी केली.

एकीकडे भाजपवर टीका करत असताना अजितदादांनी महाराष्ट्र नव निर्माण सेना हा तोड़पाणी करणारा पक्ष असल्याचा आरोपही केला. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाकिस्तानी कलाकारांच्या मुद्द्यावर खंडणी गोळा करत नाहीत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close