सीएसटी कशाला म्हणता?

April 28, 2010 11:04 AM0 commentsViews: 1

28 एप्रिल

महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव दिमाखात आणि मस्तीत साजरा करा, असे आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे.

'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेबांनी त्यांची परखड मते व्यक्त केली आहेत. त्यात छत्रपती शिवाजी टर्मिनसचा सीएसटी असा उल्लेख का करता? असा संतापजनक सवालही त्यांनी केला आहे.

या मुलाखतीत ते म्हणतात…

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलंत, तर मग सीएसटी असा उल्लेख का करता? हा उल्लेख बिल्कुल चालणार नाही. निदान मराठी माणसाने तरी सीएसटी हा उल्लेख करता कामा नये.

छत्रपती शिवाजी टर्मिनस! टर्मिनसऐवजी तुम्हाला आणखी काही मराठी हवं तर म्हणा. पण छत्रपतींचं नाव आलंच पाहिजे.

महाराष्ट्राच्या जन्माच्या आठवणी सांगतानाच शिवसेनाप्रमुखांनी राज ठाकरेंनाही टोला हाणला आहे. ते म्हणतात, आता सही रे सहीवाले आलेत बरेच जन्मास. आमच्याच आशिर्वादाने म्हणा. कृपेनं म्हणा. जे मी बोलतोय, तेच चाललंय त्यांचं…तोच त्यांचा मुद्दा आहे. म्हणजे शिवसेनेची कार्बन ते कॉपी वाटताहेत लोकांपुढे…

या मुलाखतीत बाळासाहेबांनी मोरारजी देसाईंवरही कडक भाषेत टीका केली आहे.

close