तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वासदर्शक ठराव मंजूर

October 25, 2016 1:20 PM0 commentsViews:

Tukaram munde123

25 ऑक्टोबर : नवी मुंबईचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात महापालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेने मिळून सभागृहात आणलेला अविश्वासदर्शक ठराव मंजूर झाला आहे. 105 विरुद्ध 6 मतांनी हा ठराव आज मंजूर करण्यात आला.

अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंडे रजेवर गेल्याची चर्चा होती. मात्र, मुंढे यांनी या चर्चांना पूर्णविराम देत पालिका सभागृहात हजेरी लावली आणि ते ठरावाला सामोरे गेले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढे यांची पाठराखण केली होती. त्यांना हटवलं जाणार नाही, असंही स्पष्ट केलं होतं. मात्र, आता अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री कोणता पवित्रा घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close