स्विमींग पूल प्रकरणात पालिकेचा खोटेपणा उघड

April 28, 2010 11:15 AM0 commentsViews: 5

अलका धुपकर, मुंबई

28 एप्रिल

दादरच्या स्विमींग पुलाच्या पुनर्बांधणीचे काम बीएमसीने हाती घेतले आहे. पण या प्रकल्पात बीएमसीचा खोटारडेपणा पूर्णपणे उघड झाला आहे.

विकसित झालेल्या प्लॉट्सवरचा वाढीव एफएसआय इथे घेण्यात आला आहे. तसेच स्विमींग पूल पुनर्बांधणी प्रकल्पाच्या नावाखाली म्युन्सिपल क्वाटर्सच्या दुरुस्तीपासून ते अगदी कलादालनाच्या बांधकामापर्यंतचे काम प्रत्यक्षात सुरू करण्यात आले आहे.

दादरच्या या स्विमींग पुलाची आंतरराष्ट्रीय दर्जाने पुनर्बांधणी केली जाणार आहे. पण ही पुनर्बांधणी फक्त स्विमींग पुलाची नाही तर यानिमित्ताने येथील म्युन्सिपल क्वार्टसची दुरुस्ती होणार आहे. कलादालन बांधले जाणार आहे.

या पुलाचे प्रत्यक्षात सुरू असलेले काम आणि केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाकडून मिळालेली परवानगी यात मोठी तफावत आहे. आम्ही सर्व डिपार्टमेंटस्‌ची नाहरकत प्रमाणपत्रे घेतली आहेत, असा दावा बीएमसी करत आहे. पण तसा कुठलाच पुरावा ते देऊ शकलेले नाहीत.

माहितीच्या अधिकाराखाली केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाकडून मिळालेली माहिती धक्कादायक आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या सीआरझेड क्लीअरन्सच्या पत्रात 19.64 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पण बीएमसी 42 कोटींचा प्रकल्प बांधत आहे. ही जागा फक्त स्विमिंग पुलासाठीच असल्याचे बीएमसीचा डेव्हलपमेंट प्लॅन सांगतो.

पण बीएमसीच इथे कलादालन बांधतआहे. त्याचा उल्लेखही त्यांनी केंद्राकडे पाठवलेल्या आराखड्यात केला नव्हता.म्युन्सिपल क्वार्टस्‌ची दुरुस्ती हे निवासी इमारतीचे कामही यामध्ये करण्यात येत आहे. मूळ प्रकल्पात याचा उल्लेख कुठेही नाही.

यासाठी कापलेल्या झाडांची माहिती, ट्री प्लॅन केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला कळवण्यात आलेली नाही.

येत्या शुक्रवारी 30 एप्रिलला बीएमसी स्विमींग पुलाच्या इमारतीमधील हुतात्म्यांच्या स्मारकाचे आणि कलादालनाचे उद्घाटन करणार आहे. पण त्याआधी बीएसमसीला मान्यतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे.

close